मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी

चेन्नई | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या मुलगुमूदनच्या सेंट जोसेफ स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. या कार्यक्रमातील संभाषणाचा व्हिडीओ राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केला आहे.

तुम्ही पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला होता. यावर पहिलं मी महिलांना आरक्षण देईन, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

जर कोणी मला विचारलं की तुमच्या मुलांना काय शिकवाल तर मी विनम्रता शिकवेन. कारण विनम्रता अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी मुलांसोबबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच सेंट जोसेफ स्कूलच्या मित्रांसोबत बातचीत आणि रात्रीचं जेवण केलं. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानं दिवाळी अधिकच खास बनवली, असं त्यांनी म्हटलं.

याआधीही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी तमिळनाडीच्या दौऱ्यावर होते. यावेळी तमिळनाडूच्या मूलगुमूदनच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये ते पोहोचले होते. इथे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपारिक डान्स केला होता. बातचीत सुरू असतानाच शाळेतील विद्यार्थ्यांनी राहुल गांधींला विचारलं की त्यांनी डीनरमध्ये काय खायचं आहे.

विद्यार्थ्यांचा सवाल ऐकल्यानंतर राहुल गांधींनी तिथे उपस्थित काही लोकांना विचारलं की इथे छोला भटूरा खाण्याची काही व्यवस्था होऊ शकते का?

रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने, राहुल गांधींना त्यांच्या तामिळनाडूतील मित्रांसाठी काही खास दिल्लीच्या जेवणाची व्यवस्था करायची होती आणि त्यांनी छोले भटुरे आणि कुल्फी मागवली.

सेंट जोसेफ मॅट्रिक हायर सेकंडरी स्कूल, मुलुगुमुडू, कन्याकुमारीतील मित्रांसोबतचं संभाषण आणि रात्रीच्या जेवणाप्रसंगीचे काही क्षण राहुल गांधींनी ट्विट केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!