राहुल गांधींचा नाईट क्लबमधील मैत्रिणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओ राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये असल्याचं दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. यावेळी तिथे म्युझिक सुरु असून इतर लोक डान्स करताना दिसत आहे.

भाजपचे आयटी प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांच्याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

भाजपचे सोशल मीडिया प्रभारी मालवीय यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते, असं त्यांनी म्हटलंय.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ काठमांडूमधील एका लोकप्रिय नाईट क्लबमध्ये शूट करण्यात आला आहे.

राहुल गांधी सोमवारी त्यांची पत्रकार मैत्रिण सुम्निमा उदासी हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या राजधानीतील मॅरियट हॉटेलमध्ये होते.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना अटक होणार?, महत्त्वाची माहिती समोर 

काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई! 

“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?” 

“संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही”