रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला; रेल्वे राज्यमंत्र्यांचे धक्कादायक आदेश

नवी दिल्ली | कोणी जर रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करत असेल तर त्याला जागेवरच गोळ्या घाला, असा धक्कादायक आदेश रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरातील वातावरण अशांत आहे. अनेक ठिकाणी मालमत्ता नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’ने हे वृत्त दिलं आहे.

रेल्वे सर्वसामान्य लोकांनी भरलेल्या कररुपी पैशातून चालते. तसेच एक ट्रेन तयार करायची असल्यास अनेक वर्ष लागतात. त्यामुळे रेल्वेचं कोणी नुकसान करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असंही ते म्हणाले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालसह अनेक राज्यात रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. यावर अंगडी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. काही स्थानिक समुदाय विनाकारण असं कृत्य करतात, असं ते यावर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-