“राज ठाकरे भाजपची तळी उचलतात आणि ते त्यांचे…” अंबादास दानवेंची मोठी टीका

मुंबई | मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सर्व मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधक आणि आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अधोगतीवर देखील श्रोत्यांचे लक्ष वेधले. मला माझ्या आजोबांचा (प्रबोधनकार ठाकरे) (Keshav Sitaram Thackeray) आणि काकांचा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचार पुढे न्यायायचा आहे, असे ठाकरे म्हणाले.

माझ्याजवळ कोणतीही निशाणी असो वा नसो, नाव असो वा नसो याने मला कोणताही फरक पडत नाही. माझ्याकडे त्यांचे विचार आहेत आणि ती सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

आता राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीचे विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपची तळी उचलण्याचे काम करत आहेत, असे दानवे म्हणाले.

भाजप ज्याप्रमाणे ठाकरेंना स्क्रिप्ट लिहून देते त्याप्रमाणे राज ठाकरे बोलतात आणि वागतात. सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) नोटीसीनंतर त्यांच्या भूमिकेत कमालीचा बदल झाला आहे.

तसेच राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) सोडल्यावर त्यांना आपल्या पक्षाचा साधा झेंडा देखील सरळ बनविता आला नाही. आधी कोणते झेंडे होते, आता कोणते झेंडे आहेत, असे देखील दानवे म्हणाले.

स्कतवसुली संचलनालयाची (ईडी) नोटीस येण्यापूर्वीचे राज ठाकरे आणि आताचे राज ठाकरे यांच्या कमालीची तफावत आहे. त्यांच्यात मोठा बदल झाला आहे, असे दानवे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

‘आगामी लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी असा संघर्ष असेल’

देवेंद्र फडणवीसांबाबत संभाजीराजेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका; म्हणाले, जे हिटलरने केेले…

गोविंदांना आरक्षण देण्यावरुन तृप्ती देसाई संतापल्या आणि मुख्यंत्र्यांकडे केली मोठी मागणी

इंदुरीकर महाराजांविरोधात गावकरी आक्रमक; घेतली पोलिसांत धाव