‘आगामी लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी असा संघर्ष असेल’

नवी दिल्ली | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या निवासस्थानासह सीबीआयने 31 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीनंतर सिसोदिया यांनी भाजप आणि मोदींवर कठोर शब्दांत टीका केली.

भाजपला भ्रष्टाचाराची नाही तर दिल्लीतील प्रगती आणि अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेची चिंता सतावत आहे, असे सिसोदिया म्हणाले आहेत. केजरीवालांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरुन ही कारवाई केली जात आहे, असे देखील सिसोदिया म्हणाले.

याचबरोबर त्यांनी 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीवर देखील भाष्य केले. आगामी लोकसभा निवडणूक ही अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि नरेंद्र मोदी यांच्यात होईल, असे सिसोदिया म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांना लोकांचे प्रेम मिळते आहे. त्यांच्या कामाची लोक प्रशंसा करत आहेत. म्हणून देश पातळीवर मोदींना (Narendra Modi) पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कारवाई राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचे सिसोदिया म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी हे श्रीमंतांसाठी काम करतात, राज्यातील विरोधी पक्षांचे राज्य उलथावून लावण्याचे षड्यंत्र करण्यात नरेंद्र मोदी व्यग्र असतात, असा आरोप सिसोदियांना केला आहे.

राज्य सरकारे पाडण्यासाठी नाहीतर देशासाठी काम करण्यासाठी त्यांना पंतप्रधान बनविले आहे, असे सिसोदिया म्हणाले. चांगली कामे करणाऱ्यांना अटक करणे, हे मोदींना शोभत नाही, असे देखील सिसोदिया म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

देवेंद्र फडणवीसांबाबत संभाजीराजेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका; म्हणाले, जे हिटलरने केेले…

गोविंदांना आरक्षण देण्यावरुन तृप्ती देसाई संतापल्या आणि मुख्यंत्र्यांकडे केली मोठी मागणी

इंदुरीकर महाराजांविरोधात गावकरी आक्रमक; घेतली पोलिसांत धाव

अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, येवढा अकांडतांडव…