राज आणि माझ्यात सारखं बोलणं सुरू आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधातील लढाई सगळे मिळून लढतो आहोत. यात कोणत्याच प्रकारचं राजकारण कुणी करू नये असं सांगत शरद पवार, सोनिया गांधी तसंच राजबरोबर माझं सातत्याने बोलणं सुरू आहे, असं ते म्हणाले.

मागील वेळीही उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना कोरोनाच्या लढाईत आवर्जून राज ठाकरे यांचा उल्लेख केला होता. राज मला वारंवार सूचना करतो आहे तसंच सल्लेही देतो आहे, असं ते म्हणाले आहे. संकटाच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू संपर्कात आणि सुसंवादात असल्याचं चित्र राज आणि उद्धव यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.

राज ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधाताना उद्वव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. एवढ्या मोठ्या संकटात महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत असल्याची पोचपावती त्यांनी उद्धव यांना दिली होती.

दरम्यान, कोरोनाचं विश्वव्यापी संकट आहे. या परिस्थितीत आपल्याला कोणत्याच प्रकारचं राजकारण करायचं नाही. आपण आयुष्यभर राजकारणाशिवाय काय केलं?. राजकारण आपल्या पाचवीलाच पुजलं आहे की… अशा शब्दात त्यांनी राजकारण करणाऱ्या नेत्यांना एकप्रकारे इशारा दिला.

महत्वाच्या बातम्या –

-लॉकडाऊनदरम्यान मजुरांची गर्दी जमविल्याचा आरोप; विनय दुबेला अटक

-जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी – शरद पवार

-गावी जाण्याच्या हट्टापायी मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांची हजारोंची गर्दी

-पुण्यामधे चक्क दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

-…तर त्यांनी नको त्या फुकटच्या सुचना करु नये- जितेंद्र आव्हाड