लॉकडाऊनदरम्यान मजुरांची गर्दी जमविल्याचा आरोप; विनय दुबेला अटक

मुंबई |  मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेर लॉकडाऊनच्या काळात देखील गर्दी जमवल्याप्रकरणी विनय दुबे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलं आहे. नवी मुंबईच्चा ऐरोलीमधून त्याला अटक करण्यात आलं आहे,

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष आहे. मुंबईत मजुरी काम करणाऱ्या मजुरांशी त्याचा जास्त जनसंपर्क आहे. मजुर लोकांमध्ये विनय दुबेचं नाव आदराने घेतलं जातं. परंतू लॉकडाऊनच्या काळात मजुरांची दिशाभूल केल्याने त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

विनय दुबेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्याने दिला होता. तसंच त्याने यासंबंधी फेसबुक पोस्ट लिहून आणि ट्विट करून चेतावणी दिली होती.

स्थलांतरित मजुरांना 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन शिथील होईल, असं त्यांना वाटलं होतं. तसा त्यांनी अंदाज बांधला होता. परंतू मोदींनी काल लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साडे चार वाजता वांद्र्याच्या स्टेशनबाहेर हजारो मजूरांनी एकत्र येऊन गोंधळ केला. याच प्रकरणी विनय दुबेवर आरोप ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी – शरद पवार

-गावी जाण्याच्या हट्टापायी मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांची हजारोंची गर्दी

-पुण्यामधे चक्क दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

-…तर त्यांनी नको त्या फुकटच्या सुचना करु नये- जितेंद्र आव्हाड

-धक्कादायक! पुण्यात 27 वर्षीय तरूणासह 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू!