मुंबई: संपूर्ण जगभर आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरू महिलावर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘…करा विहार सामर्थ्याने!’, असा मजकूर या फेसबुक पोस्टवर लिहला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील महिलांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी आपण नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करत असल्याचे सांगितले.
मंत्रालयाने ताजमहालसह सर्व संरक्षित ठिकाणी महिलांना मोफत प्रवेश दिलाय. दरम्यान, राज्यातही महिला दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जान्हवी कपूर, जितेंद्र जोशी आणि रिंकू राजगुरू हे सेलिब्रिटी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरे वर्धापनदिनी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!
-कामगारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कामगार मंत्र्यांना, मला नाही- अमोल कोल्हे
-“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण लोकहिताच्या कामाला स्थगिती देऊ नका”
-जसं आपणं पंढरपूर- शिर्डीला जातो, तसं उद्धव ठाकरे अयोध्येला जातात- सुप्रिया सुळे
-“मंदिर मशिदीच्या ऐवजी शाळेत फेऱ्या मारत जावा; बघा काय बदल होतो”