“राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे आहेत पण वारसदार नाही, खरे वारसदार उद्धव ठाकरेच”

मुंबई | दोन दशकापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे नावाचं नवं वादळ उभं राहत होतं. शिवसेनेचा भगवा हातात घेऊन तरूण नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं. त्या तरूणाचं नाव राज ठाकरे.

शिवसेनेत अनेक महत्त्वाच्या पदाची कामं सांभाळणाऱ्या राज ठाकरेंना शिवसेनेच्या काही नेत्यांचा विरोध होऊ लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणून राज ठाकरे यांचं नाव पुढे येत होतं.

त्याच काळात सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारणात रस दाखवला आणि शिवसेनेचं समीकरण बिघडलं. बाळासाहेबांचा वारसदार कोण? राज की उद्धव, असा सवाल उपस्थित होत होता.

मात्र, अंतर्गत वादाला कंटाळून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला आणि राज्यात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.

या सर्व प्रकरणाला आता 15 वर्ष पुर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची भूमिका घेतल्यानंतर आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.

रामदास आठवले यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय.

दरम्यान, मनसेने आता हिंदूत्वाची कास धरल्याने भाजप आणि मनसेमध्ये युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता उद्याच्या उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”

“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”

संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’

“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते” 

“राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेलेत”