“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”

मुंबई | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद समोर आले आहेत. काँग्रेस (Congress) आमदार आता खुलेआम नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाला उधाण आलं आहे.  अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर कधीच जाऊ दिलं नसतं. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर यावं, त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

जेएनयू मध्ये झालेल्या कालच्या प्रकरणावरून देखील रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. कालची घटना लक्षात घेता विचाराधारा वेगळी असली तरी देखील प्रत्येकाला काम आपले काम करण्याचा अधिकार आहे, असं आठवले म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाले, अशा घटना पुन्हा होता कामा नये, असंही आठवले यावेळी म्हणाले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमाला रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केली आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय आहे. या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”

संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’

“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते” 

“राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेलेत” 

“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखोंची गर्दी जमवून दाखवावी”