गॉगल लावून मदतीचे फोटो काढणं योग्य आहे का? राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

मुंबई | ‘आपण ज्याला मदत करत आहोत, त्याचा चेहरा दाखवून त्याला लाजवत नाही का? गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का?’ असे प्रश्न विचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह सर्वांचे कान टोचले आहेत.

प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. त्यामुळे नाईलाजाने त्याला मदत स्वीकारावी लागत आहे. अशावेळी त्यांचे फोटो काढून त्यांची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? मदतकर्त्याने कॅमेरामध्ये बघत फोटो काढणं योग्य आहे का?, असा अंतर्मुख करणारा सवाल राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांना विचारला आहे.

‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना दिल्या जात असलेल्या मदतीचं फोटोसेशन करण्यावरुन राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, मनसेच्या ईमेल आयडीवर मदतीची छायाचित्र पाठवली जाणार असतील, तर मदतीचं प्रमाण, साहित्य आणि संपर्कस्थळ याची पाठवा, असं राज ठाकरेंनी बजावलं आहे.

View image on Twitter

 

महत्वाच्या बातम्या –

-“मोदींच्या घोषनेनंतर मला गहिवरून आलं अन् पुन्हा म्हटलं सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा….!”

-लॉकडाऊनची तारीख 3 मे हीच का?? पाहा त्यामागील काय आहे कारण…

-या ठिकाणचं लॉकडाऊन 20 एप्रिलला संपणार पण…- नरेंद्र मोदी

-“विश्वजीत कदमांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी घ्यावी”

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर प्रोफाईलचा फोटो बदलला, ठेवला मास्क लावलेला फोटो