‘अशा लवंड्यांना…’; राज ठाकरे पुन्हा संजय राऊतांवर बरसले

पुणे | पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आणि 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊतांवर टीका केली.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता राज ठाकरे यांनी आपण लवंडयांबद्दल फार बोलत नाही असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला.

आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना दिला.

मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही, असं ते म्हणालेत.

माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील, असं राज ठाकरे म्हणालेत.

मला दोन घोषणा करायच्या होत्या. ते बोलले की आम्ही बोलायचं तेव्हा आम्ही बोलायचं हे काही योग्य नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलेन. लोकांना भोंग्याचा धार्मिक विषय आहे असं वाटत आहे, पण हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकारची भन्नाट योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळतील ‘इतके’ हजार रुपये

“देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होतोय” 

दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल

लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती! 

कोल्हापूरच्या निकालावरून शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले…