डिग्रीची ‘राज की बात’! सांगितला शिक्षणाचा किस्सा…!

पुणे | मी ग्रॅज्युएट नाही आणि मला आजपर्यंत कुणी डिग्रीही विचारली नाही. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

मी जे जे स्कूल ऑफ आर्टला होतो. तीन वर्षानंतर मी शिक्षण सोडून दिलं. त्यामुळे मी ग्रॅज्युएट नाही.  मला राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं होतं. त्यामुळे मला माझे काका बाळासाहेब ठाकरे आणि वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मी व्यंगचित्रकला शिकलो. या क्षणापर्यंत मला कुणी विचारलं नाही की तुझ्याकडे डिग्री कोणती आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे

राज्य सरकार ज्यावेळेला चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकतो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकामध्ये कोणतीना कोँणती कला असते, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना मनसेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिलं.

महत्वाच्या बातम्या- 

-महात्मा गांधींना शिव्या घालणारे रावणाची औलाद; काँग्रेसकडून भाजपचा समाचार

-मुनगंटीवारांनी गायलं शिवसेनेसाठी ‘हे’ खास गाणं…!

-भाजपला राजकीय पटलावर आणखी एक धक्का; यवतमाळ विधानपरिषद ही गेली भाजपच्या हातातून

-मोदींनी देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची माफी मागावी- जितेंद्र आव्हाड

-“त्या वक्तव्यातून हेगडेंची बौद्धिक दिवाळखोरीच दिसून येते; त्याबद्दल भाजपश्रेष्ठींनी माफी मागावी”