“राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची जागा घेणार”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विकासाचा मुद्दा बाजूला सारून हिंदूत्वाची कास धरली आहे. राज ठाकरे यांनी आता आक्रमक पवित्रा घेत आधी मशिंदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्यानंतर राज ठाकरे यांनी आज अयोध्या दौऱ्याचं देखील आयोजन केलं आहे. 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे.

हनुमान जयंती राजकीय पटलावर चर्चेत होती. अनेक नेत्यांनी हनुमान जयंती धुमधडाक्यात साजरी केली. हनुमान चालिसाचं पठण राज्यभर करण्यात आलं. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील शिवसेनेला इशारा दिला होता.

रवी राणा यांच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांकडून रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसैनिकांनी आमच्या घरासमोर आंदोलन केली. त्यावेळी त्यांनी बांगड्या फेकल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर मला वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेणार यामध्ये काहीही शंका नाही, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

कारण तुम्ही तुमची विचारधारा सोडलेली आहे पण बाळासाहेबांची प्रतिमा फक्त राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळते, असंही नवनीत राणा म्हणाल्या. राज ठाकरेंनी बाळासाहेबांची शिकवण सोडलेली नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत’; राज ठाकरेंचा इशारा

सरकारची भन्नाट योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळतील ‘इतके’ हजार रुपये

“देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होतोय” 

दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल

लोडशेडिंगबाॆत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती!