…तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती.

औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. तसेच या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला.

दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन करणे यानुसार ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, 2008 सालीही राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. रेल्वे परीक्षा देण्यासाठी युपी (UP), बिहार (Bihar) येथील अनेक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. त्यांनी आकसाने या परीक्षेतून मराठी उमेदवारांना डावललं असा आरोप करून मनसेने त्याविरोधात आंदोलन छेडलं.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ( VIlasrao Deshmukh ) आणि गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R.Patil) यांनी पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि कोर्टाने राज ठाकरे यांच्या अटकेचे आदेश काढले. त्यावेळी राज ठाकरे रत्नागिरी येथे होते. 19 ऑक्टोबर 2008 रात्रीचे पावणे तीन वाजले होते. पोलिसांनी त्यांना रात्रीच अटक केली आणि रातोरात त्यांना बांद्रा येथे आणण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

भोंगा प्रकरणी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; उचललं मोठं पाऊल 

शेवटी जुळलंच! राणा दा आणि अंजली बाईंनी उरकला साखरपुडा 

 वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी

 “मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावलं नाही”

 …अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ