मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं

मुंबई | हनुमान चालिसा वादावरून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याआधीही 2 मे रोजी त्यांची प्रकृती खालावली होती. तेव्हा राणाच्या वकिलाने तुरुंगात वैद्यकीय मदत दिली जात नसल्याचा आरोप केला होता.

तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेलीये.

राणाच्या वकिलाने तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून लवकरात लवकर वैद्यकीय मदत देण्याची विनंती केली होती.

राणाला योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप वकिलाने केला होता. सीटी स्कॅन केल्याशिवाय उपचार करू नका, असं वकिलाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं? 

भोंगा प्रकरणी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; उचललं मोठं पाऊल 

शेवटी जुळलंच! राणा दा आणि अंजली बाईंनी उरकला साखरपुडा 

 वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी

 “मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावलं नाही”