“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”

मुंबई | कोण जेम्स लेन?, हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल सर्वांनी ऐकला असेल. मागील काही दिवसांपासून जेम्स लेन हा राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनला आहे.  राज ठाकरे यांनी जेम्स लेनचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

जेम्स लेनने या प्रकरणावर आज खुलासा केला आहे. बाबासाहेब पुरंदरे हे माझे स्त्रोत नव्हते, असं जेम्स लेनने म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील जेम्स लेनच्या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला होता.

जेम्स लेनच्या खुलासानंतर आता राष्ट्रवादीने मनसेवर टीका केली आहे. त्यामुळे आता राज्यातील वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवचरित्राचे अभ्यासक अमरजित पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जेम्स लेनला मदत करणाऱ्या एस. एस. बहुलकर यांना त्यावेळी शिवसैनिकांनी काळे फासले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी बहुलकर यांच्या घरी जाऊन माफी मागितली होती, असं अमरजित पाटील म्हणाले आहेत.

त्यामुळे राज ठाकरे सुद्धा या बदनामीच्या कटात सहभागी झाले आहेत, असा आरोप अमरजित पाटील यांनी केला आहे. राज ठाकरेंनी जेम्स लेन आणि भांडारकर संस्थेमधील पुरंदरेलिखित राज शिवछत्रपती यावर खुली चर्चा करावी, असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची भूमिका मांडल्यापासून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये सात्त्याने ठिणगी पडत आहे. त्यामुळे आता जेम्स लेन प्रकरण इथेच थांबणार की आणखी तापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी

“आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, नाहीतर…”; तालिबान्यांचा थेट पाकड्यांना इशारा

हस्तमैथुन करणं ठरू शकतं धोकादायक; 20 वर्षाच्या मुलासोबत जे काही झालं ते…

IPL 2022: DK पुन्हा टीम इंडियात कमबॅक करणार?; विराट कोहली म्हणाला…

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: आमदार गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता!