महाराष्ट्र मुंबई

तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीने घेतली पप्पी पाहा व्हिडीओ

raj thackeray

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एका चिमुकलीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत आहे. चिमुकलीसोबत तिचे आई-वडीलदेखील आहेत. हा व्हिडीओ मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर देखील शेअर केला आहे.

एका चिमुरडीला राज ठाकरे यांना भेटण्याची आर्त इच्छा होती. तसा तिने आपल्या बाबांकडे हट्टच धरला होता आणि जेव्हा त्या निरागस चिमुकलीने राजसाहेबांची भेट घेतली.

तेव्हा राजसाहेबांनी विचारलं, तुला मला का भेटायचं होतं? त्यावर या चिमुकलीने निशब्द असं गोंडस उत्तर दिलं, असं मनसेनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

चिमुकली आणि तिचे आई-वडील आज अखेर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे यांनी चिमुकलीला तुला मला का भेटायचं होतं? असा प्रश्न विचारला. यानंतर मुलीने राज ठाकरे यांच्या गालावर पप्पी दिली. राज यांनी मायेने चिमुकलीच्या डोक्यावर हात फिरवला. हा भावनिक क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही पण… मुखमंत्र्यांचं जनतेला आवाहन

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भविकांना करावी लागणार 31 मार्चपर्यंत प्रतिक्षा

-“कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे.”

-उद्धव ठाकरेंनी का बरं राजीनामा द्यावा? तृप्ती देसाईंचा चंद्रकांत पाटलांना सवाल

-चिकन, मटन, मासे बिनधास्त खा आणि तंदुरस्त रहा; मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट