मनसेनं विधानसभेचं रणशिंग फुंकलं; दोन उमेदवार केले जाहीर!

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

राज ठाकरेंनी आज पार पडलेल्या मेळाव्यात विधानसभेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.  मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले. हे दोघेही मनसेकडून निवडणूक लढवतील, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

राज ठाकरेंनी नरेंद्र पाटील आणि दिलीप दातार यांना पक्षप्रवेश देताना त्यांची उमेदवारीही जाहीर केली. नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी गेल्यावर्षी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, त्यांचा उपचारादरम्यान निधन झालं होतं.

नरेंद्र पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर केलं नसलं तरी ते धुळ्यातूनच लढतील असं बोललं जात आहे.

दरम्यान, मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर केल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-