मुंबई | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. एकिकडे ओमिक्रॉन व्हेरिएंटची धास्ती असताना देशात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे.
देशातील 14 राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला. देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधीत रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत सर्वात जास्त रूग्ण असल्याने संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानसभेत बोलताना राजेश टोपे यांनी कोरोनाच्या ताज्या आकडेवारीबद्दल माहिती दिली आहे.
ओमिक्रॉनचे 167 रूग्ण आढळले आहेत. जी काही 600-700ची रूग्णवाढ होती ती आता वाढली असून 1600 नवे रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली. तर राज्यात डबलिंग रेट वाढला असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं.
‘कोरोनाबाधीतांची गती अशीच वाढत गेली तर डबलिंग रेट अक्षरश: एक ते दोन दिवसाचा आहे. जर ही संख्या मोठी झाली तर डबलिंग वेगाने होईल आणि जानेवारी-फेब्रुवारीत मोठी संख्या निर्माण होऊ शकते’, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक झपाट्याने प्रसार हा मुंबईत होत आहे. राज्यातील एकुण कोरोना रूग्णसंख्येपैकी 63 टक्के रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत.
मुंबईतील कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव पाहता मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत कोरोनाबाधीतांचे प्रमाण 1 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर गेले आहे.
या आठवड्याच्या सुरूवातीला कोरोनाच्या दैनंदिन रूग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला. त्यामुळे आठ ते नऊ दिवसांतच राज्यातील कोरोनाबाधीतांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.
दरम्यान, कोरोनाची ही आकडेवारी बघता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोना रूग्णांची मोठी संख्या निर्माण होऊ शकते, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर
“पंतप्रधानांनीच अशा चुका केल्या तर त्यांना कोणता बूस्टर डोसही वाचवू शकत नाही”
टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट
इंटरनेटची स्पीड 10 पट वाढणार; लवकरच येणार 5G इंटरनेट सेवा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय