मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सत्ताधारी असा वाद आपण सगळ्यांनीच पाहिला. तीन चाकी हे सरकार टिकणार नाही अशी टीका वारंवार भाजपकडून करण्यात आली. यात महाविकास आघाडीमध्ये अनेक अंतर्गत मदभेद असल्याचं समोर आलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का? असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. अशात काँग्रेस नेत्याने केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं आहे.
काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्तानं मुंबई काँग्रेसच्यावतीनं आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.
मुंबई काँग्रेसच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अस्लम शेख, नसीम खान माणिकराव ठाकरे, चरणसिंग सप्रा व इतर काँग्रेसी नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाई जगताप बोलत बोलत होते.
मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आणि आजही हेच सांगतो 236 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवेल, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना भाई जगताप यांनी भाजपवर तसेच नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची ही परंपरा भविष्यात अशीच टिकून राहणार आहे आणि राहायलाच हवी. कारण आज ज्या भयावह परिस्थितीतुन देश जात आहे. त्यातून देशाला वाचवण्यासाठी देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे, असं भाई जगताप म्हणाले.
केंद्रातील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला फकीर म्हणवतात. फकीर आपण याआधी सुद्धा पाहिलेले आहेत. पण असा फकीर आम्ही कधीही पाहिलेला नाही, जो दिवसाला चार वेळेला आपला पोशाख बदलतो, ज्याने 627 करोडचे विमान 1620 करोड रुपयांना विकले असा फकीर आपण कधीही पाहिलेला नाही, अशी टीका भाई जगताप यांनी मोदींवर केली आहे.
ज्यावेळेस देशाचा अन्नदाता शेतकरी काळे कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून राजधानी बाहेर लाखोंच्या संख्येने आंदोलन करत होता. अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते आंदोलनजीवी म्हणून संबोधतात. अशा मुजोर भाजप सरकारला चले जावं म्हणण्याची आज वेळ आली असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर
टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ