पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्ग करु शकतात या पार्श्वभूमीवर त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे, असं टोपे म्हणालेत.

पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं परवानगी द्यावी असं मत मांडल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात तिसरी लाट सौम्य स्वरुपाची शक्यता आहे, असं राजेश टोपे म्हणाले. बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी संसर्गित झाला तर तो त्याच्या आजी आणि आजोबांना संसर्गित करु शकतो त्यामुळं या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असं राजेश टोपे म्हणाले.

आरोग्य विभागाची पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास कोणतीही अडचण नसून यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, पश्चिमेकडील देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढत असताना भारतात कोरोना रुग्णसंख्या कमी होतं असल्याचं समोर आलं होतं. मात्र, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

मंगळवारी केरळमध्ये 4972 रुग्ण आढळले आहेत तर 370 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय तर दुसरीकडे केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं टेन्शन वाढलं आहे. केरळमध्ये मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 972 रुग्ण समोर आलं आहेत. तर, 370 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; वाचा हवामान खात्याचा इशारा 

“ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती लागली” 

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा 

“2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष करायचाय” 

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, मोठं कारण आलं समोर