“जानकरांवर आमचं खूप प्रेम… त्यांनी कधीही आमच्या पक्षात प्रवेश करावा”

मुंबई | महादेव जानकरांसारखे कष्ट करणारे वजनदार नेते सर्वच राजकीय पक्षांना हवे आहेत. त्यामुळे त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये यावं, अशी खुली ऑफर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दिली आहे.

जालना जिह्यात एका कार्यक्रमात बोलत असताना सातव यांनी जानकरांना ही ऑफर दिली. महादेव जानकर यांच्यावर आमचं 100 टक्के प्रेम आहे. त्यावर काहीही दुमत नाही. ते मेहनत आणि कष्ट करणारे नेते आहेत, असा कौतुकाचा वर्षाव करत सातव यांनी जानकरांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली.

सातव आता तुमचं सरकार आहे. तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे, आता काय मी मंत्री नाही, असं जानकर म्हणाले. मात्र जानकरांसारखे ताकदीचे नेते आणि कार्यकर्ते सोबत यावं असं कोणाला वाटत नाही. त्यामुळे आमची खुली ऑफर आहे. तुम्ही कधीही विचार करा, असं राजीव यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे सातव यांच्या ऑफरवर बोलण्यास जानकर यांनी नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादी बिर्याणी नाही तर गोळ्या खात आहेत”

-राष्ट्रवादीला दुष्काळाचा विसर; गटनेत्याच्या वाढदिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी!

-105 आमदारांचं तुणतुणं वाजवणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं खास उत्तर!

-गोमूत्र अन् शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही; हिंदू महासभेचा अजब दावा

-बजेटवर टीका करताना राहुल गांधींना आठवला मोदींचा व्यायाम! म्हणाले…