प्रज्ञा सातव यांचं भावूक ट्विट; राजीव सातव यांचा शेअर केला ‘तो’ संसदेतील व्हिडीओ

मुंबई | गेल्या वर्षभरापासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याबाबत घोषणा केली आहे.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी जाहीर माफी देखील मागितली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचं आता सर्व स्थरातून स्वागत होत आहे, तर काहींना हा राजकीय खेळी असल्याचं मत व्यक्त केलं आहे, अशातच राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचं एक ट्विट आता चर्चेत आहे.

प्रज्ञा सातव यांनी ट्विटरवरून राजीव सातव यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात राजीव सातव यांनी राज्यसभेत आंदोलन केलं होतं. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे.

आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे, ज्यावेळी अहंकाराचा नाश झाला सत्याचा विजय झाला आहे, असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.

जनतेच्या शक्तीने फॅसिस्ट शक्तींचा पराभव केला आहेस, अशी टीका देखील प्रज्ञा सातव यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असंही प्रज्ञा सातव म्हणाल्या आहेत.

शेतकऱ्यांनी बलिदान कधीही विसरलं जाणार नाही, आज शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजीवजी राज्यसभेत लढले होते, असंही प्रज्ञा सातव म्हणाल्या आहे.

आता शेतकऱ्यांचा विजय झालाय. राज्यसभेत लढलेल्या राजीवजींचे स्मरण नेहमी राहिल, असं भावनिक ट्विट प्रज्ञा सातव यांनी केलं आहे.

14 सेंकंदाच्या या व्हिडीओमध्या राजीव सातव राज्यसभेच्या वेलमध्ये उभा राहून आंदोलन करताना दिसत आहे. त्यावेळी राजीव सातव यांना निलंबीत केलं होतं.

राजीव सातव यांच्यासह आणखी 8 खासदारांना देखील निलंबित करण्यात आलं होतं. मोदी सरकार मुर्दाबाद, तानाशाही मुर्दाबाद अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या होत्या.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

“शरद पवार म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह, त्यांनी मला…”

 “कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार”

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद”

  थंडीत ऊन-पावसाचा खेळ; येत्या 3 दिवस ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस

  ‘मोदींनी आता ‘ही’ मागणीही मान्य करावी’; मोदींच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया