महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले

नवी दिल्ली |   संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधन करताना त्यांनी शिवसेनेसह ठाकरे सरकारवर टीकेचे आसूड ओढले. जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. भाजप धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारकडे जे विकासाचं व्हिजन असायला हवं ते अजिबातच नाहीये. महाराष्ट्राकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की या राज्यात सरकारच नाहीये. परंतू असं असलं तरी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात ज्या प्रकारे कोरोनाचा उद्रेक होतो आहे, तो चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारला जी कोणती मदत लागेल ती मदत केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

-कोकणच्या मदतीला भाजपा, 14 ट्रक मदतसामुग्री रवाना- देवेंद्र फडणवीस

-भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं; चंद्रकांतदादांचा निशाणा

-पुण्यात आज 166 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…

-शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे