Raj Thackeray | “जरा मोकळं बोलले तर इतकी हवा, मनमोकळं बोलले तर मग एकदम धुव्वा”

मुंबई | मनसे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती.

या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर आज ठाण्यात राज ठाकरेंची उत्तर सभा होत आहे. आजच्या सभेत राज ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सभेपूर्वी मनसेच्या (MNS) नेत्यांकडून वातावरणनिर्मिती करण्यासाठी ‘उत्तर सभेचा’ ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा ट्रेलर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

वारं खूप सुटलंय आणि सुटलंय ते आपलंच आहे, हा राज ठाकरे यांच्या आवाजातील वाक्य ट्रेलरमध्ये आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजच्या ठाण्यातील उत्तरसभेतही पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे.

राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी खास आजची #उत्तरसभा, असं संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-  

राज ठाकरेंच्या सभेला काही तास शिल्लक असताना संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट, म्हणाले… 

शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले… 

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात” 

नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार जणांना नोकरी 

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर