मुंबई | संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या आरोपानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावली झाली. या सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल आहेत. आता यावरून संजय राऊतांनी सोमय्यांवर सडकून टीका केली आहे.
ते महान नेते आहेत, त्यांनी अनेकांच्या भ्रष्टाचारावर हल्ले केलेते. त्यांनी लोकांना कायद्यापासून पळू नका अशी प्रेरणा दिली आणि आता तेच **** पाय लावून पळत आहेत, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी सोमय्यांवर केली आहे.
गेल्या काही वर्षापासून भाजपाचे लोक आमच्यासारख्यांवर आरोप करतात अशाप्रकारचा हा आरोप नाही. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम तयार करायचं असं हे नाहीये. त्यांनी पैसे गोळा केलेत आणि 58 कोटीचा आकडा समोर आलाय. 11 हजार की 58 कोटी पैसे जमा झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही, असं संजय राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं.
ईडीची धमकी देऊन बँकॉक, थायलंडमध्ये वसुलीचे पैसे जमा करण्यात आल्याची माहिती असून भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Raj Thackeray | “जरा मोकळं बोलले तर इतकी हवा, मनमोकळं बोलले तर मग एकदम धुव्वा”
राज ठाकरेंच्या सभेला काही तास शिल्लक असताना संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट, म्हणाले…
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात”
नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार जणांना नोकरी