मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्य चालवताय, का हजामत करताय?, अशी टीका राजू शेट्टी यांनी केलीये.
राजू शेट्टी भिलवडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं.
शेतकऱ्यांना दिवसा आणि 24 तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलं आहे.
राज्यात दुधाचे एक रकमी पैसे मिळतात,कापसाचे पैसे एक रकमी मिळतात, मग उसाचे पैसे एकरकमी का मिळत नाहीत? म्हणून आम्ही एकरकमी एफआरपीवर ठाम आहोत. राज्यात उन्हाळी सोयाबीन पिकाच्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. हे राज्य सरकार आणि कृषी विभागाचे अपयश आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत.
मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झालेली आहे. आज एका बाजूला ही फसवणूक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. रात्रीच्या वेळेस साप चावून अनेक शेतकरी मृत पावलेले आहेत. त्यामुळे चेष्टा चालवली आहे का?, असं संतप्त सवाल त्यांनी केलाय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकासआघाडीतून बाहेर पडले आहेत.आता राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022 | आंबेडकर जयंती का साजरी केली जाते?, जाणून घ्या
लोडशेडिंगबाबत नितीन राऊतांचं मोठ वक्तव्य, म्हणाले…
“दिलासा घोटाळा अलकायदा आणि कसाबपेक्षा भयंकर, जस्ट वेट अॅड वाॅच”
पंक्चरच्या दुकानात पोरं उभी होती, अचानक असं काही झालं की…; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV व्हिडीओ
Russia-Ukrain War: युक्रेनने रशियाला दिली ‘ही’ मोठी ऑफर, झेलेंस्की म्हणाले…