“महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण…”

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता
राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगलीत बोलत होते.

महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत.

तसेच ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात ही प्रवृत्ती वेगाने वाढतेय आणि देशांमध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावर सुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा काळाची पावले ओळखा, असंही राजू शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-  

एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका; विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य 

‘…तर घर गाठणं कठीण होईल’; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी 

एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले… 

“एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपच, अजित पवारांना माहिती नाही” 

‘का उगाच वणवण भटकताय, चर्चा होऊ शकते’; बंडखोर आमदारांसाठी संजय राऊतांचं ट्विट