सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणाऱ्या हॉटेलवाल्याबाबत राजू शेट्टींचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई | 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा, असं म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अडवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या हॉटेल मालकाने आज दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.

हाॅटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला. खोत यांच्या आज पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार समोर आला आहे.

निवडणुकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदर मोड करून उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत आहे.

या सगळ्या प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक हा आमचा जूना कार्यकर्ता असल्याचं शेट्टी म्हणाले.

सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझ्या मतदानाचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका; शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही” 

अग्निपथ योजनेवरून नाना पटोलेंनी मोदी सरकारला सुनावलं, म्हणाले…

‘तुमच्यात दम असेल तर…’; उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान

“जे बोलतो ते CR करतोच, येणाऱ्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर…”

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”