पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं शंभरीत पदार्पण; मोदींनी पाय धुवून आशीर्वाद घेतले

गांधीनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी त्यांची आई हीराबेन मोदी यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी पोहोचले. आई हीराबेन यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी त्यांचे पाय धुतले.

आई खुर्चीवर बसली होती आणि पीएम मोदींनी खाली जमिनीवर बसून त्यांचे पाय धुतले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी आई हीराबेन यांची काळजी घेतली, त्यांना मिठाई खाऊ घातली आणि त्यांचे आशीर्वादही घेतले.

आई हीराबेन यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पायावर शाल भेट दिली. पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आई हीराबेनला भेटतानाचे फोटोही शेअर केले आहेत, ज्यावर यूजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

शनिवारी सकाळी आपल्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी पावागड येथील महाकाली मंदिरात ध्वजारोहण करतील. यानंतर पंतप्रधान मोदी वडोदरा, खेडा, आणंद, वडोदरा पंचमहाल आणि छोटा उदयपूर जिल्ह्यातील 21 हजार कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझ्या मतदानाचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका; शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही” 

अग्निपथ योजनेवरून नाना पटोलेंनी मोदी सरकारला सुनावलं, म्हणाले…

‘तुमच्यात दम असेल तर…’; उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान

“जे बोलतो ते CR करतोच, येणाऱ्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर…”

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”