कोल्हापूर महाराष्ट्र

…तर सरकारला शॉक देऊ; वाढीव वीज बीलावरून राजू शेट्टी आक्रमक

कोल्हापूर | कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना रोजगार नाही. देशाच्या विविध भागातून उपासमारीची वेळ आल्यानं आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच कोणत्या ग्राहकांनी किती वीज वापरली याची खातरजमा न करता ग्राहकांना वाढीव वीज बील पाठवण्यात आली आहेत.

वीज बिलाच्या याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. सरकारनं जर ही वीज बीलं माफ केली नाहीत तर प्रसंगी शॉकही देऊ, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे.

राज्यातील अनेक ग्राहकांनी वाढीव विजबील आल्याची तक्रार केली आहे. कोल्हापूरमध्ये आज वीज बिलाच्या याच मुद्द्यावरून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी दूध दरवाढी संदर्भात आक्रमक झाले होते. दुधदरवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर त्यांनी विजबिलाचा मुद्दा पकडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आहे. मात्र सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा पक्ष रस्त्यावर उतरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

DTH च्या ग्राहकांना मिळत आहे चार दिवस मोफत टीव्ही पाहण्याची संधी; कसं ते जाणून घ्या!

रणवीर रेपिस्ट तर दीपिका सायको आहे; कंगना रनौत पुन्हा भडकली

राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गळती; ‘या’ बड्या नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश

‘तहसीलदार महिलेच्या पतीकडून माझ्या जिवाला धोका आहे’; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जगातील एकमेव देश, जिथे गेल्या 100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!