अमृता फडणवीस यांच्या ‘त्या’ ट्वीटला राजू शेट्टी यांचं प्रत्युत्तर!

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्या वादात सापडल्या आहेच. अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियात टीकेची झोड उठली आहे. अमृता फडणवीस यांच्या याच ट्वीटला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रत्येकाला एकच पिता असतो… आमच्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. आम्हाला तरी दुस-या राष्ट्रपित्याची गरज वाटत नाही, असं ट्वीट करून अमृता फडणवीस यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देश राष्ट्रपिता म्हणून फक्त महात्मा गांधी यांचाच आदराने उल्लेख करतो पण अमृता फडणवीस यांनी थेट पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस आहे. याच वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

 

महत्वाच्या बातम्या-