निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचं कोकणवासियांना पुन्हा एकदा नाणारचं गाजर!

सिंधुदुर्ग |  गेल्या दीड वर्षांपूर्वी जो मुद्दा अतिषय चर्चेत होता….. सत्ताधारी भाजपवर सत्तेत असलेलीच शिवसेना ज्या मुद्द्यावरून जोरदार आसूढ ओढत होती. तो मुद्दा म्हणजे कोकणातला प्रस्तावित नाणार प्रकल्प. कोकणवासियांच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या कडाडून विरोधामुळे नाणारचा प्रकल्प शासनाला रद्द करावा लागला. या सगळ्याचा 18 महिन्याचा कालावधी लोटला आहे. आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. हाच मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेच येणार आहे त्याचं कारण ठरलंय मुख्यमंत्र्यांचं नाणारसंबंधी एक वक्तव्य.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आत कोकणात पोहचली. यावेळी घेतलेल्या सभेत नाणार प्रकल्पासाठी लोकांचा उत्साह पाहून पुन्हा एकदा चर्चा करावी असं वाटतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावरूनच आता मोठी चर्चा झडणार आहे.

आज कोणताही निर्णय जाहीर करत नाही, मात्र पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार रिफायनरीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

कोकणवासियांच्या मतांवर डोळा ठेऊन मुख्यमंत्र्यांनी नाणारचं गाजर दाखवलं का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कालच आरेच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या विरोधानंतर जे नाणारचं झालं होतं… तेच आरेचं होणार, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं होतं. यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या-