“भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज करेल”

हिंगोली | राज्यात सध्या अनेक मुद्द्यांनी वातावरण गरम झालं आहे. यातच भोंग्याच्या मुद्द्यानी तर संपूर्ण महराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. त्यानंतर संपूर्ण वातावरण जोरदार पेटल्याचं पहायला मिळालं.

अद्यापही भोंग्याच्या मुद्द्यावरुन कलगितुरा सुरुच आहे. आता यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज व सहा तास हनुमान चालिसा पठण करेन, असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावळी ते बोलत होते.

दरम्यान, राज्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार असून राज्यात जोरदार गदारेळ पहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये”

  “राज ठाकरे हे भाजपचे पपेट आहेत”; धनंजय मुंडेंचा घणाघात 

  “ईडीची पीडा टाळण्यासाठी राज ठाकरेंची आजची सभा”

  Health| उन्हाळ्यात जास्त पाणी पिणेही ठरु शकतं घातक?, वाचा सविस्तर 

  “बाळासाहेब ठाकरे भोळे होते, पण मी….”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल