शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी घेणार पुढाकार!

कोल्हापूर |  हवा तर नोकरदार किंवा उद्योजकच.. ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ अशी धारणा सध्या सगळ्या मुलींची दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणजे शेतकरी पुत्रांची लग्न जमत नाहीयेत. अशाच शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुढाकार घेणार आहे.

आभासी आणि क्षणिक सुखामागे धावू नका, असा सल्ला राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या लेकींना दिलाय. शेती हा व्यवसाय सध्या तोच्याचा बनलाय. नैसर्गिक आपत्तीने हैरान झालेल्या शेतकऱ्यांसमोर सध्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न आ वासून उभा ठाकलाय. मुलीच्या किंवा पालकांच्या अपेक्षा यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीयेत.

बेभरवशाची आणि तोट्याची शेती आणि त्यातून शिल्लक राहीच राहत नाही. शेतकऱ्यालाला गाढवासारखं शेतात राब राब राबावं लागतं. शेतकऱ्यांच्या पोरांना नकार देणाऱ्या मुलीचा बापही शेतकरीच आहे. आपल्या वाट्याला जे आलं ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं त्याला वाटतं पण जर का शेतकरी नवरा-बायकोने कष्टाने शेती केली आणि त्या शेतीला पुरक जोडधंदा केला तर शेतीही काही कमी नाहीये, असा सल्ला त्यांनी मुलींना आणि त्यांच्या पालकांना दिला आहे.

तरूणींनी जर शेतकरी पुत्राशी विवाह केला तर नक्कीच तिच्या आयुष्यात आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य आल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी पुत्रांच्या विवाहासाठी मी येत्या काळात पुढाकार घेणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही!

-राजकीय पक्षांना न्यायालयाचा दणका; उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर…

-भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांची वर्णी!

-इंदुरीकराच्या मुसक्या आवळा; तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा

-‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं होणार बॉलिवूडमध्ये लॉन्चिंग