“बाबांनो, सरकारला गोत्यात आणणारी वक्तव्य करू नका”

मुंबई | अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सार्वजनिकरित्या पक्षाला त्याचबरोबर सरकारला गोत्यात आणणारी वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, नवाब मलिक, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचं सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी या सूचना दिल्याचं बोललं जातंय.

सार्वजनिक वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना नेत्यांना दिल्या. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत होणाऱ्या चर्चा बाहेर सांगू नका, अशी ताकीदही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आता लवकरच कार्यकर्त्यांची महामंडळांवर वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पुढच्या 15 दिवसात महामंडळ, समिती वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

-…म्हणून देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही!

-राजकीय पक्षांना न्यायालयाचा दणका; उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर…

-भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांची वर्णी!

-इंदुरीकराच्या मुसक्या आवळा; तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा