उदयनराजेंना रोखण्यासाठी राजू शेट्टींनी घातली समजूत; म्हणतात…

सातारा : राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली जाऊ शकतात. त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेतली असल्याचं मानलं जात आहे.

विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना राजू शेट्टी यांनी विनंती केली. त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

दरम्यान, सगळ्या आव्हानांचा सामना करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत जर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे उदयनराजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल. तेव्हा राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवं आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-