“…म्हणून मी बालाकोट एअरस्ट्राइकच्या रात्री घरी जाऊन केक कापला”

नवी दिल्ली | पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीच्या रात्री हवाई हल्ला केला. एअर मार्शल चंद्रशेखरन हरी कुमार यांनी या हवाई हल्ल्याची सर्व सुत्रे संभाळली होती.

हल्ला यशस्वी झाल्यानंतर दोनच दिवसांनी ते निवृत्त झाले. या हल्ल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून मी रात्री 12 वाजता घरी जाऊन वाढदिवसाचा केक कापल्याची आठवण सेवानिवृत्त झालेल्या हरी कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे.

केक कापून पुन्हा हरी कुमार नियंत्रण कक्षामध्ये आले आणि त्यांनी एअरस्ट्राइकची सुत्रे हाती घेतली. ‘रात्री 3 वाजून 28 मिनिटांनी सुरु झालेली ही मोहीम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण करुन भारतीय हवाई दलाची विमाने चार वाजता परत आली.

दरम्यान, आपल्या 39 वर्षांच्या सेवेतील शेवटचे 15 दिवस सर्वात रोमांचक होते, असंही हरी कुमार यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.