…म्हणून राज्यसभेची निवड बिनविरोध?, अधिकृत घोषणा 18 मार्चला

मुंबई | राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. कारण एकही जादा अर्ज आलेला नाही. 18 मार्चला या निवडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं समजतंय.

महाराष्ट्र राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असं स्पष्ट झालं आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर या सात जणांव्यतिरीक्त इतर कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या सात जणांची निवड बिनविरोध होईल, असं दिसत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार राज्यसभेसाठी मतदान होऊन निकाल जाहीर होणार होते. त्यामुळे त्याच दिवशी या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘बाळासाहेब थोरातांनी वापरला हॅशटॅग सुटाबुटातलं लुटारु सरकार’

स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने कोरोनासंशयित झाले रुग्णालयातून फरार

मुंबईचा डबेवाला करणार कोरोनासंदर्भात ग्राहकांची जनजागृती

-कोरोनाग्रस्ताने लोकांशी संपर्क केल्यास ही शिक्षा; पहा या सरकारचा अजब फतवा

-कोरोनाच्या संदर्भात अण्णा हजारेंनी पर्यटकाना केलं हे आवाहन…