भारताचा विकास होऊ नये ही चीनची इच्छा – राज्यवर्धन राठोड

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव असल्याचं दिसून येतंय. मात्र चीनची नेमकी काय समस्या आहे, याबाबत माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी माहिती दिली आहे. राज्यवर्धन राठोड लष्करात कार्यरत होते. 2013 साली निवृत्त होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

याविषयी फेसबूक लाईव्हद्वारे भाष्य करताना राठोड म्हणाले, चीनलगतच्या सीमेवर अनेक इन्फ्रास्टक्चरचे प्रकल्प चीनच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारणाने रखडले होते. मात्र मोदी सरकारच्या काळात हे सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण झाले. त्याचप्रमाणे अनेक काळ रखडलेली दारबूक-श्योक-डीबीओ रस्त्याचे कामंही 2019 मध्ये पूर्ण झालं. हा रस्त्याच्या माध्यमातून भारतीय सैन्य तुकडयांना पूर्व लडाखमध्ये नियंत्रण सीमेजवळ सहजतेने पोहोचता येईल. हे सर्व चीन सहन करु शकला नाही.

भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा नाही. पूर्व लडाखमध्ये पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या आणि ब्रिजच्या मदतीने सैन्य तुकडयांना वेगाने हालचाल करता यईल. चीनच्या विस्ताराच्या महत्वकांक्षेला हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे चीन इतका आक्रमक झाला” असंही राठोड म्हणाले.

भारताने दक्षिण आशियापुरतंच मर्यादीत रहावं अशी चीनची इच्छा आहे. पण आता हा जुना भारत राहिलेला नाही. आम्ही आमचे विकास प्रकल्प थांबवणार नाही” असं राठोड यांनी ठणकावून सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-हा कसला गोपीचंद हा तर छिछोरचंद!, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पडळकरांचा समाचार

-सुशांतने मृत्यूपूर्वी नोट लिहिली असणार; ‘या’ अभिनेत्याने केली CBI चौकशीची मागणी

-६४ एन्काउंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

-“मराठी तरुणांनी तातडीनं कंपन्यांमध्ये जॉईन होण्याचा विचार करावा’

-शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे- गोपिचंद पडळकर