हा कसला गोपीचंद हा तर छिछोरचंद!, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पडळकरांचा समाचार

मुंबई | भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलंय. या व्यक्तव्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी पडळकरांचा निषेध व्यक्त करत तातडीने माफी मागण्यास सांगितलं आहे.

रविकांत वर्पे यांनी यासंदर्भात फेसबूक पोस्ट लिहिली आहे. ‘हा कसला गोपीचंद हा तर छिछोरचंद’ अशा शब्दात त्यांनी गोपिचंद यांना खडेबोल सुनावले आहेत.  तसंच ‘पडळकर यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. असं केल्याने काय परिणाम होतात हे एकदा फडणवीसांना जाऊन विचारावं. भाजपाने गोपीचंद यांना आमदार का केलंय याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला समजलं’ असल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

भाजपच्या दारात गळ्यात पट्टा घालून साखळी घातलेल्या भूकणाऱ्याला महाराष्ट्र दाद देणार नाही. पडळकर यांनी पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आलाय.

दरम्यान, भाजपा आमदार गोपीचंद परळकर यांनी ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतने मृत्यूपूर्वी नोट लिहिली असणार; ‘या’ अभिनेत्याने केली CBI चौकशीची मागणी

-६४ एन्काउंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

-“मराठी तरुणांनी तातडीनं कंपन्यांमध्ये जॉईन होण्याचा विचार करावा’

-शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे- गोपिचंद पडळकर

-“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं”