मुंबई | बाॅलिवूडमधील ड्रामा क्विन आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच राखी पून्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
राखीने सध्या तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये राखी देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या अवतारात पाहायला मिळतं आहे. प्रियंका चोप्राच्या चित्रपचातील सर्व गाण्यांवर म्हणजेच प्रियंकाच्या चेहऱ्यावर राखीचा चेहरा दिसत आहे. यामध्ये तिनी बिनकीही घातलेली दिसत आहे.
या व्हिडीओसाठी राखीने फेस अॅपचा वापर केला आहे. या अॅपच्यामाध्यमातून राखीने स्वत:ला प्रियंका चोप्रामध्ये रुपांतरीत केलं आहे. हा व्हिडीओ पाहून राखीवर अनेकजण हसत आहेत. तसेच या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करणही सुरू केलं आहे.
राखीला या व्हिडीओसाठी अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी कमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, राखी या व्हिडीओमध्ये खूप वाईट दिसतं आहे. तर काहींनी असं म्हटलं आहे की, राखीनेही अशीच आपली फिगर बनवली पाहिजे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करताना राखीने ‘his one is for @priyankachopra So proud of her’ असं कॅप्शन दिलं आहे.
यापूर्वी राखीने असा एक व्हिडीओ आपल्या सोशल मिडीया आकाऊंटवरून शेअर केला होता. त्यावेळी तिने श्रीदेवीच्या नागीन चित्रपटामधील मै तेरी दुश्मन , तेरे नैनामधील काजोल आणि गेंदा फूलमधील जॅकलिन फर्नांडिजच्या जागी आपलं फेस लावलं होतं. यासाठीही तिने फेसअॅपचा वापर केला होता. तसेच त्यावेळी तिला या व्हिडीओला अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखी सावंत एक व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. सेल्फा काढायला आलेल्या व्यक्तीने मास्क घातलं नसल्यामुळे राखीने त्याला खूप सुनावलं. ती म्हणाली की,’ नो! भाईसाब मास्क लगावो, तुम लोगोकीं वझसे ये मुंबई बंद हुई है | ये गलत बात है |’
तिचा हा व्हि़डीओ प्रचंड व्हायरल झाला होता. राखीचा हा व्हिडीओ ‘Voompla’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओ अनेक वेगवेगळ्या कमेंटही आल्या होत्या.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा अशी घेतेय स्वतःची
विमानात प्रवासादरम्यान तरूणाने असं काही केलं की, तातडीने…
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन,…