‘बिग बाॅस’च्या घरात राखी सावंतचा मुलगा, म्हणतेय राहूल वैद्य आहे ‘या’ मुलाचा बाप

मुंबई | वादग्रस्त वक्तव्य क्वीन, आयटमगर्ल म्हणून ओळख असलेली राखी सावंत नेहमी चर्चेत असलेली पहायला मिळत असते. राखी सध्या ‘बिग बाॅस 14’ च्या घरात असून घरात रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. तिनं वाइल्ड कार्ड एंट्री करत बिग बाॅसच्या घरात पदार्पण केलं होतं. आल्यापासून राखी कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. यातच ती आता नव्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

बिग बाॅस 14 च्या फिनालेसाठी थोडेच दिवस बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना दिसत आहे. त्यामुळे सध्या बिग बॉस 14 मध्ये राखी सावंत चांगलीच धुमाकुळ घातलाना दिसत आहे. तिच्या मनोरंजनानं आता तिच्याकडे एक एंटरटेनर म्हणून देखील पाहिलं जात आहे.

कलर्स टीव्ही ने त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत आणि राहूल वैद्य एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. राखीनं एका जॅकेटला गुंडाळून बाळ बनवलं आहे. ती त्या बाळासोबत खेळताना दिसत आहे. त्याचबरोबर ती या बाळाचे वडिल राहूल वैद्य असल्याचा दावा करताना दिसत आहे.

राखीचं हे बोलणं ऐकून राहूलही तिच्यासोबत मस्ती करण्यासाठी येतो. राहूल नशेत असल्याचं नाटक करत तो त्या मुलाचा वडिल नसल्याचं सांगताना दिसत आहे. राहूल आणि राखीची ही मस्ती पाहून शेजारी बसलेले रुबिना, अलि यांनाही हसू अनावर होतं. या प्रोमोवरुन बिग बाॅस सीजन 14 चे पुढील भाग अतिशय रंजक होणार असल्याचा अंदाज येतोय.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. चर्चेत राहण्यासाठी स्पर्धक काय करतील काही सांगता सोय नाही. या व्हिडिओवरुन ते दिसूनही आलं. काही लोकांना त्यांची ही मनोरंजनाची शैली आवडते तर काहींनी नाही. त्याचबरोबर बिग बाॅस स्पर्धक एकमेंकाविराधात खेळताना दिसत आहे.

दरम्यान, ‘बिग बाॅस सीझन 14’ चा शेवटचा आठवडा असून प्रत्येक स्पर्धक झोकून देऊन खेळताना दिसत आहे. त्यामुळे आता या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बाबा रामदेव यांचा पुन्हा एक दावा! ‘हा’ रामबाण उपाय केल्यास कोरोना रूग्ण तीन दिवसांत बरा होणार

होम क्‍वारंटाइन रुग्णांवर मुंबई पालिका प्रशासनाचं असणार लक्ष, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला देखील माहित हवेत ‘हे’ नियम; नक्की जाणून घ्या

संपूर्ण रेल्वे तिच्यावरुन धडधडत गेली अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!

निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठवली 150 कंडोमची पाकिटं; वाचा काय आहे प्रकार