बाबा रामदेव यांचा पुन्हा एक दावा! ‘हा’ रामबाण उपाय केल्यास कोरोना रूग्ण तीन दिवसांत बरा होणार

नवी दिल्ली | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणले आहे. या महामा.रीमुळे सर्व उद्योगधंदे कित्येक महिने बंद होते. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील  वेळ आली होती.

भारतात देखील कोरोनामुळे लाखो लोकांचे ब.ळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारतात सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना भारतात वेगाने हातपाय पसरु लागला आहे.

भारतात कोरोनावरील लसीकरण सुरु देखील झालं आहे. मात्र, अशातच आता बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ या आयुर्वेदिक कंपनीनं पुन्हा एकदा कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात शुक्रवारी रामदेव बाबांनी याची घोषणा केली आहे.

मुख्य म्हणजे पतंजली कंपणीच्या या औषधाच्या लॉंचिंग कार्यक्रमला काही मंत्री देखील उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. तसेच आयुष मंत्रालयाने देखील कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. या टॅबलॅटमुळे 70 टक्के रुग्ण 3 दिवसांत बरे होतात.

दरम्यान, यापूर्वी बाबा रामदेवांच्या ‘पतंजली’ या आयुर्वेदिक कंपनीनं कोरोना विषा.णूवर कोरोनिल औषध तयार केल्यानं मोठा गाजावाजा झाला होता. मात्र आयुष मंत्रालयाकडून पतंजलीला कोरोनिल आणि स्वसारी या औषधांची जाहिरात थांबवत तपासणीला सामोरं जायला सांगितलं होतं.

कोरोना विषाणूवर ‘कोरोनील’ व ‘स्वसारी’ ही औषध गुणकारी असल्याचा दावा करण्यात आला होता. या औषधाला मान्यता मिळाल्याचंही बाबा रामदेव यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आयुष मंत्रालयानं त्वरित एक पत्रक जाहीर करत पतंजलीकडून औषधाचा तपशील मागवून घेतला होता आणि या औषधांची जाहिरात थांबवत तपासणीला सामोरं जायला सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

होम क्‍वारंटाइन रुग्णांवर मुंबई पालिका प्रशासनाचं असणार लक्ष, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला देखील माहित हवेत ‘हे’ नियम; नक्की जाणून घ्या

संपूर्ण रेल्वे तिच्यावरुन धडधडत गेली अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!

निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठवली 150 कंडोमची पाकिटं; वाचा काय आहे प्रकार

पूजाच्या वडिलांचा नवा गौप्य.स्फोट, भाजपचं घेतलं नाव!