‘दादागिरी खपवून घेणार नाही’, रक्षा खडसेंचा इशारा

जळगाव | शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन रक्षा खडसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. किरीट सोमय्या यांना पुण्यात ज्या प्रकार खाली पडून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे, असं त्या म्हणाल्या.

रक्षा खडसे जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे कार्यकर्ते दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न हा एसटी महामंडळ बंद होऊन खाजगीकरण कसे करता येईल यासाठी आहे. सरकारचा फायदा कसा होईल यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

जेव्हा राज्य सरकारला टॅक्स कमी करण्याची वेळ येते त्यावेळेस जनतेचा विचार केला जात नाही उलट वाईनला परवानगी दिली जाते, असा आरोप देखील रक्षा खडसे यांनी केला.

खरोखर जनतेविषयी महाविकास आघाडी सरकारला चिंता आहे तर केंद्र सरकार एक पाऊल मागे घेतले तर राज्य सरकारने घेऊन वरील टॅक्स कमी करावा. कर कमी न करता कोरोनाच्या काळातही वाईन ला परवानगी देण्यात येते हे चुकीचे असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

राज्यात दारूबंदीसाठी महिला आंदोलन करत आहे मात्र राज्य सरकार दारू विक्रीला परवानगी देत असेल तर हे चुकीचं आहे, असही रक्षा खडसे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या- 

बापलेकीचं नातं.. सुप्रिया सुळेंनी स्वत:च्या हातांनी शरद पवारांना बूट घातले, व्हिडीओ व्हायरल 

लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला?, पाहा काय घडलं 

Work From Home बाबत केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

  ह्युंदाईला पाकिस्तानचा पुळका, भारतीयांनी ‘असा’ उठवला बाजार!

  नितेश राणे यांना मोठा झटका; कोठडीत मुक्काम वाढला