बापलेकीचं नातं.. सुप्रिया सुळेंनी स्वत:च्या हातांनी शरद पवारांना बूट घातले, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती.

दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते.

सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यानंतर ते खाली येऊन खूर्चीवर बसलेही. त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.

आदरांजली वाहण्यासाठी जाताना ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांनी आपल्या पायातील बूट खालीच काढले होते. यानंतर ते खाली उतरले तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

वडीलांना त्रास होतोय, कष्ट घ्यावे लागतील, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रिया सुळे यांनी हेरलं. आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार मनी न बाळगता, सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवार यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

आपल्या बाबांची मदत करण्यासाठी, त्यांना काहीही कमी-जास्त व्हायला नको, त्रास व्हायला नको, याची काळजी घेताना खासदार सुप्रिया सुळे यावेळी शिवाजी पार्कात दिसून आल्यात.

महत्वाच्या बातम्या- 

लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला?, पाहा काय घडलं 

Work From Home बाबत केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

  ह्युंदाईला पाकिस्तानचा पुळका, भारतीयांनी ‘असा’ उठवला बाजार!

  नितेश राणे यांना मोठा झटका; कोठडीत मुक्काम वाढला

  लतादिदी अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह अनेकांची हजेरी