भाजप-सेनेत मेळ नाही… कदम म्हणतात ‘आमचं ठरलंय’! तर महाजन म्हणतात…

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला होता. हा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याच्या सूत्रावर सहमती झाली आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिळून घेतील. तसंच युतीच्या जागावाटपाचे सूत्रही अजून निश्चित झालेले नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी कदमांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

भाजप- शिवसेना यांच्यामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चेची पहिला फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेत भाजपने 160 जागांची मागणी केली आहे. तर शिवसेनेने 110 पेक्षा कमी जागा स्विकारायला नकार दिला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यासाठी भाजपवर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-