सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना- राम कदम

मुंबई | सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये वाद पेटला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांवरून राज्यासह देशभर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात द्वंद्व पेटलं आहे.

अनिल देशमुख यांना काल ईडीनं 13 तासांच्या चौकशीनं केल्यानंतर अटक केली यावरून राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

परिणामी महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना, अशी जहरी टीका कदम यांनी केली आहे.

देशातील वातावरण सध्या या मुद्दयावर जोरदार पेटलेलं आहे. पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूली मध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

वसूलीचे हिस्सेदार ,वाटेकरी ,कोण कोण नेते आणी पक्ष आहेत ? हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेल मध्ये जावे लागेलच, अशी टीका कदम यांनी केली आहे.

राम कदम यांनी महाविकास आघाडीवर जहरी टीका करताना उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वात चर्चीत पोलीस कारवाई म्हणून सध्या अनिल देशमुख यांच्या प्रकरणाकडं पाहिलं जात आहे.

मुंबई पोलीस दलाला जगातील सर्वात चांगलं पोलीस दल म्हणून ओळखण्यात येतं पण गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणानं मुंबई पोलीसांची प्रतिमा डागाळत असल्याची टीकाही भाजपनं केली आहे.

राम कदम सातत्यानं महाविकास आघाडीवर ट्विट करून टीका करत आहेत. ही लढाई कोण्या एका विशेष व्यक्तीच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना कर, असं त्यांनी म्हटलंय.

महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी ? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना ?, अशी टीका कदम यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल” 

खबरदार, माझ्या अंगावर कोणी आलं तर सोडणार नाही- अमृता फडणवीस 

राष्ट्रवादीला गेल्या दोन दिवसात लागोपाठ दुसरा झटका, आता ‘या’ मंत्र्याची संपत्ती होणार जप्त

“…तर मी फोटोग्राफी केली असती आणि फडणवीसांना प्रदर्शनाला बोलावलं असतं”

पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटलं आहे- किरीट सोमय्या