“२ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही”

अहमदनगर |  विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचेच सूर गेले काही दिवस प्रतिक्रियांच्या माध्यमातून उमटलेले पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलणयात आली. परंतू पंकजा यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली गेली. यावरूनच २ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही, असा टोला राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

राम शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून पंकजा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्क्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी नेते आणि इच्छुक समजून घेतील आणि शिकतील, असे म्हटले होते. त्या अनुशंगाने पंकजा मुंडे यांनी 2 दिवसांत चांगला अभ्यास केला. जो मला आणि इतरांना नाही जमला”

दुसरीकडे पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा सहवास लाभलाय. पंकजा यांना मोठं भविष्य आहे. तसंच त्या समजूतदार देखील आहे. या वेळी त्या समजून घेतील, अशा शब्दात पंकजा यांना समजूत घालण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-…त्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्या ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा- संजय राऊत

-कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती

-काळा पैसा भारतात आणण्याची मोदींना संधी; शिवसेनेचा सल्लावजा टोला

-पक्षासाठी खडसेंचं योगदान मोठं, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्भाग्यपूर्ण- नितीन गडकरी

-‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे ‘मेक इन इंडिया’चं बदललेलं नाव- शशी थरुर